
Episode 472 as on 13th January 2026
Guru Shishya Sukhanandsamwad as on 13th January 2026 तू रंगता प्रेम माझे रंगे । प्रेमअनुभव येई सर्व अंगे । रमूनी रंगणे तोचि माझा छंद। देवा तुझ्या प्रेमाचा मज लागे नाद ॥ वासना व अहंकारामुळे जीवाला दु:ख आहे. सुखाच्या मृगजळामागे धावता धावता दु:खच उगाळले जाते. मूर्तितल्या देवाचा धावा करून दु:ख तेवढ्यापुरते दूर होते पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. अनुभवाने हे पटल्यानंतर मी शांति व समाधानाच्या शोधात निघालो व कर्मधर्मसंयोगाने व भाग्याने प्रभूंची भेट झाली व होत राहिली. दु:खापेक्षा दु:खाचे मूळ आहिस्ता आहिस्ता दूर करणारे त्यांचे प्रेम व आपुलकी मनाला स्पर्श करत गेली व प्रेमाची गोडी निर्माण झाली. मनात त्यांच्या प्रेमाचा अंकुर फुटला. भेटीत तुष्टता मोठी. ऋणानुबंधाच्या या गाठी. देवा तुझ्या प्रेमाचा ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.
Audio and video play straight from the show's own hosting. PodSubs stores and serves no media.

